Breaking News
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली
भायखळा पोलीस वसाहतीची पाहणी
- इमारतींची दुरुस्ती करण्याचे आश्वासन
मुंबई : केतन खेडेकर
भायखळ्यातील पोलिसांची घरे आणि वसाहतींच्या दुरवस्थेसंदर्भात आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेतील भायखळा येथील पोलीस वसाहतीला भेट देऊन पाहणी केली.
भायखळा पोलीस वसाहतीतील प्रत्येक घर, स्लॅब, शौचालये, इमारतीतील मधली रिकामी जागा यांची देखील पाहणी केली. प्रत्येक घरात जे आवश्यक ती सर्व दुरुस्ती, वैयक्तिक प्रत्येक घरात शौचालय व इमारतींची दुरुस्ती करण्याचे आश्वासन यावेळी केसरकर यांनी या वसाहतीतील रहिवाशांना दिले. सदर काम तीन महिन्यात चालू करण्यात येईल, असे आश्वासन केसरकरांनी दिले. याआधी दारुखाना येथील पोलीस वसाहतींची पाहणी बुधवारी केली होती. यावेळी पोलीस बांधव, गृहिणी आणि तेथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. भायखळा विधानसभेतील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय लिपारे, दत्तात्रय जाधव, शिवसैनिक आणि महिला आघाडी यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर