Breaking News
रेल्वे शु शाईन कामगार आणि रेल्वे कंत्राटी कामगारांसाठी रविवारी मोफत विमा वाटप
मुंबई : लोकवर्ता टाइम्स
जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनची सहयोगी संस्था जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियनच्यावतीने सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री डॉ.ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे शु शाईन कामगार आणि रेल्वे कंत्राटी कामगार यांना मोफत विमा वाटप करण्यात येणार आहे. जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन आणि आरपीआय (आ) शिक्षक मतदार संघ यांच्यावतीने युनायटेड इन्शुरन्स कंपनी प्रा. ली.च्या माध्यमातुन हे विमा वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी दादर रेल्वे स्थानक, दुपारी २ वाजता, फलाट क्रमांक ६ येथे आयोजित कराण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम आरपीआय (आ) शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानमित्र घनश्याम चिरणकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष दिलिप पवार, जन राष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय महासचिव दिपक काळींगण, युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे प्रकाश जाधव, दादर स्टेशन मास्टर ए के पांडे साहेब, आरपीआयचे सुरेश बारशिंग, सिध्दार्थ कासारे, सोशल आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष अंकुश हिवाळे, दिनेश जैन, राजीव शहा, डॉ.जयेश डाके, जन राष्ट्रीय रेलवे शु शाईन कामगार युनियनचे केंद्रीय महासचिव संदीप पाटील, महाराष्ट्र अध्यक्ष प्रेमानंद जगताप, महाराष्ट्र सचिव अनिल कुमार, सहसचिव सचिन गायकवाड आणि सदस्य अमित शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सहका-याने आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण भारत देशामध्ये २५ हजार रेल्वे शु शाईन कामगार आणि रेल्वे कंत्राटी कामगारांना या विमा योजनेचा लाभ होणार आहे.
रिपोर्टर