Breaking News
कवी नामदेव साबळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रेस क्लब मुंबई येथे प्रकाशन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
साहित्य क्षेत्रात नव्याने पदार्पण करणारे नामदेव साबळे यांच्या सूर्यबिंब ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अर्जुन डांगळे यांच्या हस्ते प्रेस क्लब सीएसटी आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आले असून, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे राजकीय विश्लेषक सुनील कदम, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कवी अनंत धनसरे आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नामदेव साबळे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून प्रेस क्लब सीएसटी आझाद मैदान मुंबई येथे ( दिनांक १९/०५/२०२३ संध्या. ०५:४५ वा ) सदर कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रिपाई नेते राजाराम खरात यांच्या विशेष उपस्थितीमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राजू रोटे करणार आहेत, तर आभार प्रदर्शन सुनील कांबळे हे करणार आहेत. असे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रकाश कांबळे आणि कनिष्क साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर