Breaking News
तुळशी तलाव ओव्हरफ्लो !
- मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला
मुंबई : लोकवार्ता टाईम्स
गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावात पाणी ओसंडून वाहत असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील महत्त्वाचा जलाशय असलेला तुळशी तलाव मुंबईच्या अनेक भागांना पाणीपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह इतर भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुळशी धरण गुरूवारी भरून वाहू लागला. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जर असाच चांगला पाऊस पडत राहिला तर इतर धरणेही भरली जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाचा जलाशय असलेला तुळशी तलाव मुंबईच्या अनेक भागांना पाणीपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
त्याचा ओव्हरफ्लो अतिवृष्टी किंवा इतर कारणीभूत घटकांमुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ दर्शवितो. ओव्हरफ्लोमुळे शहराच्या जलस्रोतांची भरपाई होण्यास मदत होऊ शकते, परंतु यामुळे सखल भागात संभाव्य पूर येण्याची चिंता देखील निर्माण होते.
रिपोर्टर