Breaking News
मणिपूर अत्याचाराचा आरेत निषेध
- मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसतर्फे आंदोलन
- पारंपरिक वेष परिधान करून आदिवासी बांधवही रस्त्यावर
मुंबई : प्रतिनिधी
मणिपूरमधील हिंसा आणि आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेप्रकरणी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आणि विरोध दर्शविण्यासाठी आरे कॉलनी येथील आरे चेकनाका येथे निषेध आंदोलन करणात आले. यामध्ये सुमारे ४० आदिवासी महिलांनी आपल्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे पारंपारिक वेष परिधान करून आपला निषेध नोंदविला. मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेस यांच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव मोघे, मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष क्लाव्हई डायस, माजी महापौर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महासचिव राजेश शर्मा, मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेस अध्यक्ष सुनील कुमरे या आंदोलनावेळी उपस्थित होते.
'आदिवासी समाज सुरक्षित नाही जेव्हा जेव्हा आदिवासी जनतेवर अन्याय होईल, त्यावेळी मुंबई आदिवासी कॉंग्रेस रस्त्यावर येईल', असे सुनिल कुमरे यांनी आपल्या निषेध भाषणात सांगितले. तसेच त्यांनी मणिपूरमधील हिंसेचा निषेधही नोंदवला. यासह बोरिवली काजूपाडा येथील संजय फरले यांच्या घरावर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्ते रात्री १२ च्या सुमारास वस्ती खाली करण्यासाठी गेले म्हणून त्यांचा सुध्दा कुमरे यांनी निषेध या आंदोलनात केला. यावेळी संपूर्ण ताकदीनिशी आदिवासी कॉंग्रेस सोबत उभे राहू, असे जिल्हा अध्यक्ष क्लाव्हई डायस यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महासचिव यांनी सुध्दा आपल्या भाषणात मणिपूर येथील घटनेबद्दल निषेध व्यक्त केला केला. यावेळी मुंबई आदिवासी कॉंग्रेस उपाध्यक्ष कैलास पटेल, महासचिव संजय फरले, आदिवासी नेते शिवा गावित, रामू थोरात, मुकेश बाविसा, गणेश तेली तसेच विचार विभाग मुंबई अध्यक्ष राकेश यादव, एससी विभाग उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र जोगदंडे, पीसीसी संतोष सिंह, उत्तर भारतीय विभाग जिल्हा अध्यक्ष दिनेश सिंह, ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले, सूरज गुप्ता, नकुल यादव, एससी विभाग मुंबई महासचिव जयराम मुरगन तसेच अनेक महिला पारंपारिक आदिवासी पेहरावात आणि कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून मणिपूरमध्ये होत असलेल्या अमानवीय हिंसाचाराचा निषेध नोंदविला.
रिपोर्टर